राज्यात गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाळा सुरू झाला असून या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेय पित असतो. अशातच या दिवसांमध्ये लिंबाचा वापर जास्त होतो. कारण उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि इलेक्ट्रोलाइटस देखील कमी होत नाही. पण लिंबू फक्त जेवणातच नाही तर त्वचेच्या समस्यापासुन मुक्तता मिळावी यासाठी देखील वापरला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात.
लिंबूमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पुरळ आणि मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तसेच तुमच्या त्वचेला ताजेपणा आणि हायड्रेशन प्रदान करते, ज्यामुळे चेहरा मऊ आणि निरोगी होतो. लिंबाचा योग्य वापर करून त्वचेच्या अनेक समस्या सोडवता येतात. लिंबू त्वचेच्या समस्या कशा दूर करतो आणि त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग उजळ करतो. जर तुमच्या त्वचेवर पिगमेंटेशन, डाग किंवा सन टॅनिंगची समस्या असेल तर लिंबाचा रस त्यावर काम करू शकतो. लिंबाचा रस सौम्य ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो.
मुरुमांसाठी उपयुक्त
लिंबूमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावर येणारे मुरुमे आणि पुरळ रोखण्यास मदत करतात. तसेच लिंबाचा रस त्वचेतील अशुद्धता आणि जास्तीचे तेल काढून टाकते, त्यामुळे मुरुमांचा धोका कमी होतो.
स्किन टोन सुधारते
लिंबाचा रस त्वचेचा रंग सुधारण्यासाठी देखील काम करते. लिबांच्या रसाचा वापर करून तुम्हाला चमकदार त्वचा मिळवता येते. लिंबाचा नियमित वापर त्वचेला ताजेतवाने करतो.
त्वचा घट्ट आणि तरुण बनवते
लिंबूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात. त्याचबरोबर त्वचा घट्ट करण्यास मदत करते, ज्यामुळे सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील फाइन लाइन्सची समस्या कमी होते.
त्वचेवर लिंबाच्या रसाचा वापर कसा करावा?
एका भांड्यात लिंबाचा रस काढा, लक्षात ठेवा की तुम्ही लिंबाचा रस थेट त्वचेवर लावू नका. तुम्ही त्यात मध किंवा गुलाबजल मिक्स करू त्वचेला चांगल्या प्रकारे लावा. जे त्वचेला ओलावा देते.
नेहमी लक्षात ठेवा की लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्यानंतर सूर्यप्रकाशात जाऊ नये. जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा. या सर्व खबरदारींसह, तुमच्या त्वचेच्या काळजीच्या दिनचर्येत लिंबाचा समावेश करून, तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यापासून आराम मिळू शकतो.