---Advertisement---

…थांबा आणखी एक विकेट जाणार ; खा.सुळे यांचा गौप्यस्फोट !

By team
On: March 17, 2025 10:27 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु आहे तर राज्याच्या अर्थसंकल्प सुरु असतांना महायुतीचे धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी आणखी आक्रमक आरोप करू लागली असणा आता शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांचे एक मोठे विधान चर्चेत आले आहे. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रविवारी आयोजित आढावा बैठकीत सुळे बोलत होत्या. एकवेळ मी विरोधात बसेन, परंतु मी नैतिकता सोडणार नाही, असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते जर या पक्षात असते तर मी या पक्षात नसते, त्यामुळे बरे झाले पक्ष फुटला. त्यांनी केलेल्या या प्रकारानंतरच खरी लढाई सुरू झाली. यावर मी आज पहिल्यांदा बोलले आहे. मला नको ते ठेकेदारांचे पैसे. त्यावर माझे घर चालत नाही. बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे म्हणाल्या, मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यावेळी हे या सर्व प्रकाराची गंमत बघत होते, किती ही विकृती आहे. हे वास्तव आहे. अवादा कंपनीला काम देऊ नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र दिली आहेत. पत्रही यांनीच द्यायची, खंडणीही यांनीच गोळा करायची, हा हक्काचा एक्का तोच आहे, असा आरोप सुळे यांनी केला.

मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिंमत असेल, तर समोर येऊ लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे, असे म्हणत खा. सुळे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत त्यांना आव्हान दिले.

औरंगजेब कबरीबाबत माझे मत असे आहे की, इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि राज्याला रस्ता दाखवावा. खरा इतिहास आहे तो समोर आला पाहिजे. शिक्षण आरोग्य या सगळ्या विषयात आता सरकारने लक्ष घालावे. विरोधक आरोप करत आहेत की लोकशाही आहे. या राज्यात सर्वात जास्त खंडणीखोर कुठल्या पक्षात आहेत हे वेगळे सांगायला नको, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!