---Advertisement---

नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात हजर

On: January 4, 2021 4:55 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. वर्षा राऊत यांना 5 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.

 

मात्र, आजच ईडी कार्यालयात हजर होत वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे. वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडू शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याची चर्चा होती. ती गर्दी व गोंधळ टाळण्यासाठीच वर्षा राऊत एक दिवस आधीच चौकशीसाठी हजर झाल्याचं बोललं जात आहे.

 

पीएमसी गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!