बार्शी : प्रतिनिधी
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे देखील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुर्डूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे बेल्टने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी सामूहिक अत्याचार केला. भाऊ- बहिणीच्या नात्याला व माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता त्यांना दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पिडीत 34 वर्षीय पिडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेचा नवरा पुण्यात सेंट्रींग काम करतो तर मुलगी बार्शीत शिक्षणास आहे. त्यामुळे ती मागील तीन महिन्यापासून मुलीकडेच राहते. सुरेश परसु माळी याच्यासोबत संबंधित पिडितेचे सुमारे सात वर्षांपासून प्रेमसंबध आहेत. सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा त्या महिलेस बहीण मानत होता. सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्यातून पीडितेला बार्शीकडे न्यायला आले. त्यास पीडितेने नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली.
पुढे बार्शीत आल्यावर संतोषने सांगितले की तू माझी बहीण आहेस तुझं सुरेश एकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमव. तेव्हा सुरेश याचेशी बोलून सुरेश माळी याचे मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळविले. दि. 22 डिसेंबर 2024 रोजी पिडिता लग्नाला आली होती. लग्न झाल्यानंतर पीडितेचे पती हे जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वर्हाडाच्या गाडीत पाठवले. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांनी मिळून पिडितेस चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो असे म्हणून सुरेश माळी याने त्याच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसवून कुर्डूवाडी रोडवरील लॉजवर नेले. तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला. तसेच तू गावात राहायचे नाही. तू पुण्यात जाऊन राहायचे. जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत.