---Advertisement---

शिवप्रेमी झाले प्रशांत कोरटकर विरोधात आक्रमक ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त !

By team
On: March 25, 2025 1:56 PM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून दुपारी 2:45 वाजता ताब्यात घेतले असून त्याला कोल्हापूरला आणले आहे.आज त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून थोड्या वेळाने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.सध्या कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जमा झाले असून ते आक्रमक झाले आहेत. पोलिस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान जुना राजवाडा परिसरात नागरिक हातात कोल्हापुरी चपला घेत दाखल झाले आहेत. कोरटकरला कोल्हापुरी चपलेने प्रसाद दिल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याला पोलिसांचे संरक्षण देण्यात येत आहे. तो काय सरकारचा जावाई आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांनी विचारला आहे.

प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस गत 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सोमवारी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले गेले. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला तिथे आणले गेले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

प्रशांत कोरटकरचा नागपूर, इंदूर, मुंबई, चंद्रपूर येथे शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके गठीत केली होती. सदर आरोपीचा अटकपूर्व जामीन देखील कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला होता. आज देखील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होती. दुपारी साडेचार वाजता ही सुनावणी होणार होती. परंतु, त्याआधीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने रद्द केलेला आहे. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतले असून पोलिसांचे पथक त्याला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. रात्री उशिरा आरोपीला कोल्हापुरात आणल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून उद्या न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर बऱ्याच अँगलने तपास करत होते. त्यामध्ये राजवाडा पोलिसा ठाण्याची देखील दोन पथके होती. स्थानिक गुन्हे शाखेची पथके गठीत केली होती. बरीचशी माहिती आम्हाला प्रसारमाध्यमांमधून मिळत होती. काही टोलनाक्यांवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. आरोपी एका वाहनातून जात असताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला. त्यानंतर पथके तेलंगाणाकडे रवाना करण्यात आली, असे महेंद्र पंडित यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!