---Advertisement---

अक्कलकोट विद्युत विभागाचे विभाजन करून नव्या उपविभागाच्या निर्मितीस मंजुरी

By team
On: March 27, 2025 8:48 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गेल्या कित्येक वर्षापासून असलेली मागणी लक्षात घेऊन अक्कलकोटच्या विद्युत उपविभागाचे अक्कलकोट उपविभाग एक आणि उपविभाग दोन असे विभाजन करण्यास
राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.यावेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विजेच्या प्रश्नावर आवाज उठवून सदर समस्या कमी कराव्यात यासाठी आग्रही मागणी केली होती. त्याची दखल घेण्यात आली आहे.

बारामती परिमंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सोलापूर विभागातून पूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी एकच उप विभाग करून आजपर्यंत कारभार केला जात होता. विद्युत वितरण कंपनीचा वाढता व्याप लक्षात घेता आता लोकांना अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी सध्याच्या एकूण नऊ शाखे पैकी अक्कलकोट उपविभाग एक यात चार शाखा तर अक्कलकोट उपविभाग दोन यात पाच शाखा असे विभाजन करण्यात आलेला आहे. उपविभाग एक यात अक्कलकोट ग्रामीण शाखा, अक्कलकोट शहर शाखा,वागदरी शाखा व हन्नूर शाखा यांचा समावेश आहे. तर नव्याने निर्मित उपविभाग दोन यात मैंदर्गी, दुधनी, करजगी, नागणसूर व तडवळ शाखा यांचा समावेश करण्यात आलेला आहे.या नवनिर्मित विद्युत उपविभाग दोन यात एकूण बारा पदांची नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे. ज्यात वितरण विभागाशी संबंधित उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अभियंता याची प्रत्येकी एक पदे आणि उच्चस्तर लिपिक (२)आणि निम्न लिपिक (४), सहाय्यक लेखापाल (१) मुख्य तंत्रज्ञ (१)आणि शिपाई (१) अशा एकूण बारा नवीन पदांच्या निर्मितीस मंजूर देण्यात आली असून एकूण १ कोटी २६ लाख ८९ हजार १०४ रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आलेले आहे.

या दोन विभागांच्या निर्मितीमुळे एकाच विभागावर पडणारा भार कमी होऊन वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांची प्रलंबित कामे वेळेवर होऊन त्यांना होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. अक्कलकोट तालुक्याच्या विजेच्या वापराच्या दृष्टिकोनातून कामांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी एका नव्या उपविभागाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक होते. त्याची मंजुरी मिळाल्याने त्याचा खूप मोठा लाभ नागरिकांना होणार आहे.

वीज वितरणच्या कारभारात सुधारणा होईल

अक्कलकोटच्या वीज वितरण प्रणालीसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. सदर निर्णयास अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी मंजुरी दिलेली आहे.यासाठी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे सहकार्य लाभले आहे.त्यामुळे वीज वितरणच्या कारभारात सुधारणा होईल.

सचिन कल्याणशेट्टी,आमदार

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!