---Advertisement---

लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी जाहिर

By team
On: March 29, 2025 2:00 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्ह्याच्यावतीने पदनियुक्ती व आढावा बैठकीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे पार पडला.लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्षपदी नागेश जाधव यांची तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी वसंत देडे यांची निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव महाराज भोसले, प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण,पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता जगताप, योगेश सोनवणे याशिवाय करमाळा ,माढा, बार्शी या विभागाचे संजय कदम, जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ कसबे, सोलापूर शहर संपर्क परशुराम कांबळे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हयातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या . अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या विभागाच्या अध्यक्षपदी नागेश जाधव व जिल्हा संपर्कप्रमुख वसंत देडे तर वैशाली डोलारे यांची सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.या निवडी प्रसंगी सोलापूर शहर कोअर कमिटीचे अध्यक्ष विकास डोलारे, किसन जाधव, ज्ञानेश्वर कांबळे, शंकर हातागळे, पृथ्वीराज नाईकनवरे,अनिल झंपले, लखन पाटोळे, अविनाश पारखे,गणेश पवार, सागर कोलारे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!