---Advertisement---

मंत्री आठवले यांचे मोठे वक्तव्य : …तर डॉ.बाबासाहेब पंतप्रधान झाले असते !

By team
On: April 8, 2025 2:49 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले  हे सध्या जळगाव दौऱ्यावर आले असतांना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी “संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते, असे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले जळगावमध्ये माध्यमांशी सवांद साधताना,”केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही. तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने यासंदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, “असा गंभीर आरोप त्यांनी केला.

जम्मू काश्मीरमध्ये 99 टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले, त्यामुळे सद्यस्थितीत खूप शांतता आहे. काँग्रेसच्या काळात 370 कलम हटवले असते तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता. काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना भडकवत आहे. मात्र भाजप किंवा एनडीए हा मुस्लिमांच्या विरोधात नाही, असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर केला.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, “औरंगजेब कबरीचा वाद हा छावा चित्रपट पहिल्यानंतरसमोर आला. मात्र शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव होते. सर्व धर्मांमध्ये बंधू भाव वाढविण्यासाठी संविधान आहे. आणि हा वाद जास्त वाढू नये, असे माझे मत आहे. ” असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच “संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते, “असेही महत्वाचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!