---Advertisement---

ब्रेकिंग : भरदिवसा पती-पत्नीवर झालेल्या गोळीबाराने मोहोळ हादरले !

By team
On: April 9, 2025 2:19 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर भरदिवसा गोळीबारचा थरारक घटना घडली असून जुन्या वादातून पती-पत्नीवर थेट गोळीबार करून हल्लेखोर फरार झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामध्ये शिवाजी जाधव यांना एक गोळी तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून
गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याचे समजते. शिवाजी जाधव (65) आणि सुरेखा जाधव (60) यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

पंढरपूर येथे शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव एकादशी निमित्ताने गेले होते देव दर्शनाला पंढरपूर वरून परत येत असताना येवती गावाच्या हद्दी दबा धरून बसलेला दशरथ गायकवाड यांनी गोळीबार करत ठार करण्याचा प्रयत्न केला आहे. चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण झाली होती, मारहाणी नंतर मोठा अपमान झाल्याची भावना होती. चार वर्षे जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आरोपीचा शोध घेण्यासाठी सूचना दिले आहेत. दशरथ गायकवाड याचा शोध घेण्यासाठी मोहोळ पोलिसांचे दोन पथके रवाना झाले असून मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!