---Advertisement---

शरद पवार शनिवारी सोलापुरात घेणार मुक्काम : असा असेल दिनक्रम

By team
On: April 9, 2025 2:23 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीना वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे शनिवारी सोलापुरात दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. पहिल्या दिवशी पवारांचा मुक्काम होणार असून पवार यांचे शनिवारी तीन वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी जातील, तिथे तीन ते पावणेसहा वाजेपर्यंत हॉटेल सरोवर मध्ये त्यांचा वेळ राखीव आहे.

 

 

 

सायंकाळी सहा वाजता विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरणसाठी जातील. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा बालाजी सरोवर या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहील. रविवारी सकाळी नऊ वाजता विमानतळाकडे जातील तिथून हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!