---Advertisement---

जेष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची माढा लोकसभा डिजिटल मीडियाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

By team
On: April 13, 2025 10:27 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर सुयश मीडियाचे ब्युरो चिफ महेश गायकवाड यांची माढा लोकसभा क्षेत्रासाठी डिजीटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मिरज येथे पार पडलेल्या डिजीटल मीडिया च्या राज्यस्तरीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली आहे. या निवडी नंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन स्थळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे, ऑल इंडिया प्रेस असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भाऊ वानखेडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि भोकरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे प्रमुख संजय भोकरे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणी डॉ विश्वास राव आरोटे इलेक्टोनिक मीडियाचे विधिमंडळ वार्ताहर संघाचे रणधीर कांबळे डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
महेश गायकवाड हे सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार असून त्यांनी आज पर्यंत विविध वृत्तपत्रांमध्ये कामकाज केले आहे गेल्या ४० वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. बहुजन आणि आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी आपली सर्वाधिक पत्रकारिता खर्ची घातली आहेत. राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील गंभीर घटना व प्रसंगावर त्यांनी प्रकाश टाकून अनेक प्रकरणे त्यांनी मार्गी लावून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अन्याय अत्याचार यावर आवाज उठवत त्यांनी सतत निर्भीड आणि रोखठोक पत्रकारिता केली आहे.

सद्या त्यांनी स्वतःच्या सुयश डिजीटल मीडिया ग्रुप ची जबाबदारी सांभाळत असून साप्ताहिक चैत्यभूमी हे वृत्तपत्र नेटाने चालवत आहेत.

त्यांच्या या निवडी बद्धल अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी रिपाइं चे महाराष्ट प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे आर पी आय चे नगरसेवक आणि तरुणांचे आयकॉन अजित गायकवाड यांच्यासह रॉयल नगरदेवक मिलन कल्याणशेट्टी, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सचिव संजय रणदिवे भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष सुबोध वाघमोडे कोनाळी गावचे माजी सरपंच आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश बनसोडे अक्कलकोट तालुका RPI चे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अक्कलकोट शाखेचे अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक यश सिद्धी चे मुख्य संपादक कमलाकर सोनकांबळे , लोकशाही टीव्ही चॅनेल चे पत्रकार चंद्रशेखर भांगे , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अक्कलकोट तालुका सचिव विश्वनाथ राठोड, धाराशिव जिल्ह्याचे माजी क्रीडा अधिकारी आणि भीमशक्ती सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र सचिव अशोक बनसोडे , उद्योजक मधुकर सुरवसे, गोगावच्या सरपंच वनिता मधुकर सुरवसे, जतचे तहसीलदार चंद्रशेखर लिंबारे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूर येथील मैत्री ग्रुप रावण साम्राज्य सामाजिक संस्था यासह अनेक सामाजिक संस्था व संघटना आणि विविध मंडळांनी ही महेश गायकवाड यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!