ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुळजापूर उप-जिल्हा रुग्णालयात मोफत महा-आरोग्य शिबिरात अनेकांनी घेतला लाभ !

अक्कलकोट : प्रतिनिधी

दिनांक १५ एप्रिल २०२५ आज रोजी उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे मलगोंडा हॉस्पिटल, अक्कलकोट व अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर व उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत महा-आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात तुळजापूर येथील २१० नागरिकांचे ईसीजी, ब्लड शुगर, वजन व बीपी, या सर्व तपासण्या करण्यात आल्या व मोफत औषधेही देण्यात आले डॉक्टर प्रथमेश मलगोंडा यांनी सुमारे 30 रुग्णांचे तपासणी केली. व त्यांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेबद्दल माहिती दिली तसेच मलगोंडा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांचे सर्वांना माहिती दिली व मोलाचे मार्गदर्शन म्हणजे उपस्थित नागरिकांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आरोग्य किती महत्त्वाचे आहे याची त्यांना माहिती दिली.

या मोफत आरोग्य शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपक चोरमुले,डॉ. घाटे , डॉ. अखिलकुमार राठोड व योजनेचे आरोग्यमित्र श्री. विकास माळवदकर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!