---Advertisement---

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट : सुभाष देशमुखांच्या सोबत राहणार !

By team
On: April 16, 2025 5:29 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसाआधी सर्वच नेते एकत्र आल्याने मोठी खळबळ उडाली होती आता याच सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी जेष्ठ आमदार सुभाष देशमुख हे पॅनल उभे करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

यावर माजी सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, या निवडणुकीत मी भाग घेणार नाही हे यापूर्वी सांगितले आहे परंतु सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे पॅनल उभा करणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार असे सांगताना जिल्हाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकार दिले आहेत हे आम्हाला माहीत नाही तसे कोणी सांगितले ही नाही असे म्हणत नकळत नाराजी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!