---Advertisement---

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून : सांगोला हादरले !

By team
On: April 17, 2025 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

सांगोला येथे आई-वडिलांना दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करत असल्याचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केला. यामध्ये कार्तिक नामदेव यादव (वय 28, रा. चिंचोली, ता. सांगोला) हा ठार झाला आहे. तर संशयित आरोपी तुषार यादव (वय 25) यास सांगोला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (दि. 16) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास कार्तिक नामदेव यादव हा दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करीत असल्याचा राग मनात धरून लहान भाऊ तुषार नामदेव यादव याने शिवरत्न पेट्रोल पंपाच्या समोरून घराकडे जाणार्‍या रोडवर मनोहर नामदेव घाडगे यांच्या शेतातील रस्त्याच्या बाजूला चाकूने भोसकून कार्तीक नामदेव यादव याचा खून केला. मुलाचे वडील नामदेव रावसाहेब यादव यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. संशयित आरोपी तुषार यादव याला पंढरपूर भागातून अटक केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!