---Advertisement---

‘मराठी आदमी गंदा है, ; मनसेने शिकविला गुजराती नागरिकांना धडा

By team
On: April 17, 2025 10:43 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या मागील महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषेबाबत मनसे चांगलाच आक्रमक झाला असतांना आता पुन्हा एकदा मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी- गुजराती वाद टोकाला गेला आहे. घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये मराठी कुटुंबीयांना खालच्या दर्जाची भाषा वापरून गुजराती लोकं त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे.

शाह नावाच्या एका व्यक्तीने मांसाहार करण्यावरुन संबंधित कुटुंबाला, ‘मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो’, असे म्हटले. मात्र मनसैनिकांनी मराठी माणसाला त्रास देणाऱ्या या गुजराती नागरिकांना चांगलाच धडा शिकवला आहे.

या सोसायटीत बहुतांश कुटुंब ही जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत. तर केवळ चार मराठी कुटुंब आहेत. गेल्या काही दिवसांपासून मांसाहार खाण्याच्या मुद्द्यावरुन या मराठी कुटुंबांना जैन आणि गुजराती बांधव त्रास देत आहेत. शाह नावाच्या व्यक्तीने याच कारणावरुन एका मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिली.रोज येता जाता गुजराती लोकांकडून टोमणे मराठी नागरिकांना एकावे लागतात. सततच्या या त्रासाला कंटाळून शेवटी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी नागरिकांनी मनसेकडे तक्रार केली.

घाटकोपरमधील मनसे नेते राज पार्टे यांनी या सोसायटीमध्ये धाव घेत गुजराती नागरिकांना चांगलाच दम भरला. तेव्हा शाह नावाची व्यक्ती समोर आलीच नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाशी आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही, आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणत नाही, अशी सारवासारव करताना दिसले.
तसंच, ‘या सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंबं राहत असली तरी याठिकाणी जर मराठीचा मुद्दा आला तर ४ हजार मराठी लोकं याठिकाणी येऊन तुम्हाला जाब विचारतील’, असं देखील राज पार्टे यांनी सांगितले. यानंतर मनसैनिक राज पार्टे यांनी पोस्ट शेअर करत ‘या घाटकोपरमध्ये आम्ही मराठी माणसासाठी रोज रोज किती भांडायचं, तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो. संपूर्ण सोसायटी गुजराती फक्त 4 जण मराठी आहेत. रोजचा यांचा त्रास मराठी माणसाला, खालच्या दर्जाची भाषा वापरून रोजचा अपमान. आज घुसलो कायते ऐकदा होऊनच जाऊ दे. सगळ्यांची .. फाटली,’ असे लिहिले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!