---Advertisement---

आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवू नका ; संजय राऊतांचे प्रतिउत्तर !

By team
On: April 17, 2025 5:47 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

 

ठाकरे गट व शिंदे गट आरोप  प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

अमित शाहांनी त्यांना तंबी दिली आहे की, फडणवीसांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधून दूर राहा. तुमच्याशिवाय ही हे सरकार चालेल. मला माहित आहे, त्यांच्या काय चर्चा असतात. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे खाती-पीती घरं सोडून बाहेर कसे निघतील ? त्यांनी नेत्यांना सांगितलं आहे की, आपण इथेच राहूया, चाकरी करू, भांडी घासू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला आनंद दिघे शिकवू नये आणि बाळासाहेब ठाकरे सांगूच नका, असे म्हणत संजय राऊतांनी शंभूराज देसाईंसह शिंदे गटावर निशाणा साधला.

बुधवारी नाशिक येथे उद्धवसेनेचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात बाळासाहेबांचे एआयच्या माध्यमातून भाषण दाखविण्यात आले होते. त्या भाषणातून शिंदेसेनेसह भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. या टीकेला शिंदेसेनेकडून जोरादार प्रत्युत्तर देण्यात आले होते. यामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धवसेनेवर टीका करताना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आम्हाला शिकवू नये, असे म्हणताना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्यावर जोरादार टीका केली होती. आज त्यावर संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!