---Advertisement---

नागणसूर, जेऊर, शिरवळ, समर्थनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित

By team
On: April 23, 2025 9:00 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

दि.२२ : २०२५ ते ३० दरम्यान मुदत संपणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही प्रक्रिया नवीन तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सुरू झाली.ती ३ वाजेपर्यंत चालली होती. आपल्या गावचे आरक्षण पाहण्यासाठी विविध गावच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान अनेकांच्या चेहऱ्यावर ‘कही खुशी कही गम’ अशा प्रकारचे वातावरण हे दिसून आले. तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार विकास पवार आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी विराज वासेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लहान मुलांच्या हातून चिट्टीद्वारे आरक्षण काढण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जे आदेश तहसील कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यानुसार ही आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली. यामध्ये
एकूण ११८ ग्रामपंचायतीची वर्गवारी केल्यास अनुसूचित जाती ८, अनुसूचित जाती महिला ७, अनुसूचित जमाती २, अनुसूचित जमाती महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग १६, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १६, सर्वसाधारण ३४ ,सर्वसाधारण महिला ३४ अशा पद्धतीचे हे आरक्षण काढण्यात आले.

गावनिहाय आरक्षण खालील प्रमाणे.

अनुसूचित जाती – चपळगाववाडी, किणीवाडी, मिरजगी ,केगाव खुर्द, वसंतराव नाईक नगर, तळेवाड, गुरववाडी, शिरवळवाडी.

अनुसूचित जाती महिला – पितापूर, कुरनूर, नागनहळळी, जकापूर, मातनहळळी, सिंदखेड, गांधीनगर /सोळसे तांडा /ग्रामीण म्हेत्रे तांडा.

अनुसूचित जमाती – हसापूर, देवीकवठे.

अनुसूचित जमाती महिला – कल्लप्पावाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग – गौडगाव बुद्रुक, कडबगाव/ सेवालाल नगर, मंगरूळ, कलकर्जाळ, सदलापूर ,दोड्याळ ,बादोले बुद्रुक, हंजगी ,नागोरे, कंठेहळळी, बोरोटी खुर्द/ सेवा नगर/ विजयनगर ,बोरगाव दे, भुरीकवठे, खैराट, आंदेवाडी ज, नन्हेगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला –
रुदेदेवाडी, खानापूर, केगाव बुद्रुक, रामपूर/ इटगे,सिन्नुर, काझीकणबस, साफळे, निमगाव, कल्लहिप्परगे, अरळी, गळोरगी, बणजगोळ, चिक्केहळळी, हालहळळी अ ,कुमठे, संगोगी (आ).

सर्वसाधारण – तोरणी, सुलतानपूर, सुलेरजवळगे,नागणसूर, तोळणूर, हैद्रा, अंकलगी ,जेऊर ,संगोगी ब, शिरवळ ,बोरेगाव, धारसंघ, शेगाव ,बऱ्हाणपूर, मराठवाडी, सांगवी बुद्रुक /हिंगणी/ कोळेकरवाडी, समर्थनगर, बबलाद /परमानंद नगर, किरनळळी, घुंगरेगाव, कर्जाळ, ब्यागेहळळी, गौडगाव खुर्द, उमरगे ,इब्राहिमपूर, किणी, आळगे, जेऊरवाडी, कोर्सेगाव, चिंचोळी मैं,सलगर, दहिटणेवाडी, गोगाव, कुडल.

सर्वसाधारण महिला – मुगळी,हत्तीकणबस, चुंगी, करजगी, बासलेगाव/ रामतीर्थ, शावळ, शिरसी/ बादोले खुर्द /काळेगाव, सातनदुधनी, दहिटणे, वागदरी, उडगी,बिंजगेर/ हालहळळी मैं, म्हैसलगी, तडवळ, हन्नूर, बोरोटी बुद्रुक/ महालक्ष्मी नगर, मोट्याळ/ बसवगीर,
आंदेवाडी खुर्द,हिळळी, कोन्हाळी, गुडेडवाडी, पालापुर, मुंढेवाडी, चपळगाव/ बावकरवाडी, भोसगे, हालचिंचोळी, नाविदगी, घोळसगाव, चिंचोली न, आंदेवाडी बुद्रुक, डोंबरजवळगे / अकतनाळ, दर्शनाळ, सांगवी खुर्द /कोळीबेट/ ममदाबाद,हंद्राळ/ जैनापुर.

पाच ग्रामपंचायतीचे आधीचे आरक्षण रद्द ?

याआधी मुदत संपलेल्या सातनदुधनी, कल्लप्पावाडी,समर्थनगर, वसंतराव नाईक नगर ,गांधीनगर या पाच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु पुन्हा या नव्या आरक्षण सोडतीमध्ये या ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आधीचे आरक्षण रद्द झाल्याची चर्चा होत
आहे. नवीन आरक्षण जाहीर झाल्याने जुन्या आरक्षण संपुष्टात आल्याची चर्चा या गावांनी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!