---Advertisement---

अक्कलकोट येथे जैन समाजाबांधवांनी काढला निषेध मोर्चा

By team
On: April 25, 2025 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

जैन धर्म आणि समाजावर वारंवार होणारे अन्याय दूर करण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुका सकल जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला जैन बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. थोरल्या जैन मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर सेंट्रल चौक,कारंजा चौक मार्गे पोलीस स्टेशन येथे नेऊन निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली.

नुकतेच विलेपार्ले, मुंबई येथील जैन मंदिर बेकायदेशीर पद्धतीने महापालिकेने पाडले आहे. सदर मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्याची विटंबना करण्यात आली असून मंदिरातील मूर्ती भंग करण्यात आली आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.या घटनेमध्ये जे जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी अभय खोबरे यांनी केली.दरम्यान उद्ध्वस्त केलेले मंदिर त्याच जागेवर पुन्हा बांधावे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे,असेही त्यांनी सांगितले.मागील कित्येक वर्षांपासून जैन धर्माच्या तीर्थस्थळावर अतिक्रमण करणे, यात्रेकरूंवर हल्ला करणे, जैन मुनी साध्वींवर हल्ला करणे व त्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे असे प्रकार सुरुच आहेत.

यामागे नेमका उद्देश काय आहे त्याचा शोध घेणे आवश्यक आहे,असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी प्रशांत विभूते, राजकुमार शहा, संदेश शहा,सौरभ शहा, राहुल आळंद, स्वप्निल आळंद,अप्पू आळंद,निनाद शहा,डाॅ.विपुल शहा, प्रकाश शहा,अभिनंदन आळ्ळे,स्वप्निल शहा,विपुल दोशी,विराग दोशी,दिलीप सिध्दे, निखिल मेहता,विद्या विभूते, अनिता खोबरे,मीनल शहा, माधुरी शहा, मंजुश्री आळ्ळे, दर्शना लेंगडे,सविता खोबरे,सपना शहा आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!