---Advertisement---

भाविकांसाठी महत्वाची बातमी : आता श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरात ‘या’ वस्तू नेण्यास बंदी !

By team
On: April 26, 2025 9:49 AM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणार्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरासदृश प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व कर्मचार्‍यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कर्मचार्‍यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हीआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे.

मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही यावेळी श्रोत्री यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!