---Advertisement---

उद्धव ठाकरेंची पोस्ट  : वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!

By team
On: April 26, 2025 5:02 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. “वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी” अशा आशयाची पोस्ट शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली असून सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

शिवसेनेची पोस्ट चर्चेत…!

वेळ आलीयं, एकत्र येण्याची
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!

प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय, कमेंटसचा पाऊस

या पोस्टद्वारे शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांना पुन्हा साद घातली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे. ‘लवकर एकत्र या, एकत्र या लवकर मग कशी मज्जा येते विरोधकांची ते बघायला संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे’. ‘प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय’. ‘एकदा घोषणा झाली की मग वादळ आणि फक्त वादळ’. ‘राजउद्धव’. अशा कमेंटसचा पाऊस पडत आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावर आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये परतणार आहेत. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेशी दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे 29 एप्रिलला मुंबईत परतणार आहेत. युतीच्या चर्चेदरम्यान ठाकरे बंधुंचा हा परदेश दौरा सुरू आहे. तर दोन्ही नेते मुंबईत परतल्यानंतर कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागून राहिले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!