---Advertisement---

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अक्कलकोट बंदची हाक

By team
On: April 27, 2025 10:04 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट व्यापारी महासंघाने सोमवारी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे.या बंद मध्ये सर्वांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी केले आहे. पर्यटकांवर अमानुषपणे झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे या घटनेचा निषेध म्हणून आम्ही हा बंद करत आहोत, असे सर्व व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. शनिवारी, सकाळी ११ वाजता सर्व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
त्यावेळी झालेल्या बैठकीत हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

या दिवशी आठवडा बाजार असला तरी सर्व व्यापारी बांधवांनी शंभर टक्के आपले व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे,असे या बैठकीत ठरविण्यात आले.या बैठकीला व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते,नितीन पाटील, गजानन पाटील,प्रकाश उण्णद, विजयकुमार कुलकर्णी,दिनेश पटेल, सिध्दाराम टाके, राजशेखर हिप्परगी, संतोष पत्तरगे, बागवान, मुल्ला,गुंडु घिवारे, संतोष घिवारे,नितीन महाडकर,सुयश शहा,राजु शहा,रामु पाटील, अप्पासाहेब पाटील,चेतन साखरे, राजशेखर सोड्डे,अजय आडवितोटे, प्रमोद पाटील, स्वामीनाथ आलदी आदींसह इतर सर्व व्यापारी संघटनाचे पदाधिकारी व व्यापारी बांधव उपस्थित होते.

निषेध मुक मोर्चाचे आयोजन

या बंदला अक्कलकोट अडत व्यापारी असोसिएशनसह सर्व हिंदूत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजता खंडोबा मंदिर येथून काळ्या फिती लावून निषेध मूक मोर्चा काढला जाईल आणि जुन्या तहसील जवळ येऊन तहसीलदार यांना निवेदन दिले जाईल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!