---Advertisement---

मंत्री गोरे प्रकरण ; रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांची नोटीस !

By team
On: May 2, 2025 3:15 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे आता राज्याचे माजी विधानपरिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पोहचत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण रामराजे निंबाळकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

रामराजे नाईक निंबाळकर यांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. उद्या (शनिवारी) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला होता. या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेले काही कार्यकर्ते यांना नोटिसा बजावल्याची माहिती आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!