ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चांगल्या लोकांशी संपर्क साधल्यामुळे तुमच्यात नवीन काही शिकण्याची ताकद जागृत होईल

आजचे राशिभविष्य दि.७ मे २०२५

मेष राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज सकारात्‍मक विचारसणी असणार्‍या लोकांसोबत वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्क क्षेत्रातही वाढ होईल. कुटुंबासोबत खरेदी करत वेळ घालवू शकता. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आज घेतलेले घाईघाईचे निर्णय बदलावे लागतील. वैयक्तिक कामांसाठी वेळ काढता येणार नाही, त्यामुळे मन थोडं अस्वस्थ वाटेल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहील.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही सामाजिक कामात व्यस्त राहाल. तुमच्या भविष्याच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे योग्य वेळ आहे. विशेषतः स्त्रिया आपल्या कार्याविषयी जागरूक असतील. कधीकधी छोट्या गोष्टींवर राग आल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. आज आपल्या वर्तनाची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा कारण त्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक असेल. गॅस व अॅसिडिटीच्या त्रास टाळण्‍यासाठी आहाराकडे लक्ष द्या.

मिथुन राशी

आज तुमचे सकारात्मक विचार निर्णय घेण्यास मदत करतील. चांगल्या लोकांशी संपर्क साधल्यामुळे तुमच्यात नवीन काही शिकण्याची ताकद जागृत होईल. चिंतेतून सुटका होऊ शकते. आज गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून टीका ऐकावी लागू शकते, ज्यामुळे नाराजी वाटेल. एखाद्या आध्यात्मिक स्थळी थोडा वेळ घालवल्याने मन शांत होईल. व्यवसायाच्या दृष्टीने आज यश मिळणार नाही. आरोग्य चांगले राहील.

कर्क राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. मात्र यश मिळाल्‍याने थकवा दूर होईल. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सध्या ग्रहांची स्थिती सकारात्मक आहे, त्याचा पूर्ण उपयोग करा. वाहन किंवा यंत्रसामग्री वापरताना खबरदारी घ्या. विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणामुळे अभ्यासात अडचणी येतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी येऊ शकते आणि तुम्ही ती योग्य प्रकारे पार पाडाल. कामाच्‍या धावपळीत कुटुंबासाठीही थोडा वेळ काढा.

सिंह राशी

श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढू शकते. आज तुमचे काही अडलेले काम पूर्ण होऊ शकते. घरात काही बदलांसाठी चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत अत्यंत शहाणपणाने निर्णय घ्या. फसवणुकीची शक्यता आहे. वाद-विवाद शांततेने मिटवा. तुमच्या योजना आणि कामांबद्दल कोणासोबतही चर्चा करू नका. आज वातावरणातील बदल तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या पूर्वीच्या चुका लक्षात घेऊन वर्तमान सुधारण्याचा विचार कराल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. कुटुंबातील सदस्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने आनंद मिळेल. आज वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

तुळ राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहेत. नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. घरातील वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळू शकते. तरुणांनाही यश मिळून दिलासा मिळेल. भावना नियंत्रणात ठेवा. खूप कमी लोक याचा फायदा घेऊ शकतात. काही खास गोष्ट मिळाली नाही तर चिंता वाटू शकते. मालमत्ता आणि वाहन संबंधी व्यवहार सुधारतील. पती-पत्नीमधील संबंध गोड राहतील.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे महत्वाचे उद्दिष्ट पूर्ण करण्‍यासाठी पूर्ण प्रयत्‍न करा तुम्‍हाला यश मिळेल. एखाद्या नातलगासोबत महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा होऊ शकते. शेजाऱ्यांशी काही वाद होऊ शकतो. बाहेरच्या कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. राजकारणात वाईट लोकांपासून दूर रहा. व्यवसायात अडचणी येतील.

धनु राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज मालमत्तेवरील वाद एखाद्याच्या मध्यस्थीने शांततेने सुटू शकतो. एखाद्या जवळच्या नातलगाला भेट दिल्याने दैनंदिन तणावातून आराम मिळू शकतो. आळस आणि रागामुळे तुमच्या जीवनातील गोष्टी बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय किंवा नोकरी संबंधित कोणतेही निर्णय शांतपणे घ्या. घरातील वातावरण आनंददायी राहील. पोटाच्या तक्रारी होऊ शकतात.

मकर राशी

दीर्घकाळ प्रलंबित काम आज प्रयत्नांमुळे पूर्ण होईल. तुम्ही राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये प्रभाव दाखवू शकता. मुलांच्या अडचणी ऐकून त्यावर उपाय शोधण्यासाठी वेळ द्या. सामाजिक कामांबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. न्‍यायालयानी प्रलंबित प्रकरण अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने मिटवा. व्यवसायात योग्य व्यवस्था ठेवा. पती-पत्नीमधील किरकोळ वाद होऊ शकतात. वातावरणातील बदल आरोग्यावर परिणाम करू शकतो.

कुंभ राशी

आज विद्यार्थी अभ्यासावर आणि करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करेल. घरातील ज्‍येष्‍ठांचे आशीर्वाद लाभतील. वाहन खरेदीचा विचार करत असाल, तर हा काळ शुभ आहे. स्पर्धक कार्यक्षेत्रात सक्रिय होऊ शकतात. कोणताही निर्णय भावनेच्‍या आहारी जावून घेवू नका. वाद टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मीन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही कुटुंबाशी संबंधित कामांत व्यस्त राहाल. चांगल्या व्यक्तीच्या संगतीमुळे आज तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. दुपारी काही वाईट बातमी मिळू शकते, त्यामुळे मन खिन्न होऊ शकते. मनोबल खचू देऊ नका, नाहीतर कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. वातावरणातील बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!