नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत – पाकीस्तानमध्ये युद्ध सुरु झाले असतांना दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन चार दिवसही झाले नाहीत आणि पाकिस्तानमधील खासदारांनी त्यांच्याच सरकारविरुद्ध कठोरपणे बोलण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खासदार शाहिद खट्टर स्वतःच्या सरकारला कोंडीत पकडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शाहिद खट्टर पंतप्रधान शाहबाज यांना भित्रा म्हणाल्याचे दिसून आले. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही घेऊ शकत नाहीत, ते घाबरले आहेत. अशी व्यक्ती त्यांच्या सैन्याला काय संदेश देऊ शकेल?
https://x.com/adityasvlogs/status/1920765830435856888?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1920765830435856888%7Ctwgr%5Efebc172863068d1a0ece1b31b42b0704fc0e0a81%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Four-prime-minister-narendra-modi-is-scared-pakistani-mps-statement-is-a-hot-topic-watch-video%2F
गेल्या गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैन्याने त्यांचे सर्व मनसुबे उधळून लावले. प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने केवळ २ एफ-१६ सह ४ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली नाहीत तर पाकिस्तानच्या पंजाबमध्ये एक एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम विमानही पाडले आहे. या एकाच मोठ्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई देखरेख आणि युद्धभूमीच्या क्षमतेला मोठा धक्का बसला आहे.