---Advertisement---

पवारांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान !

By team
On: May 10, 2025 3:05 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असून आता शरद पवार पक्षाचा एक गट अजित पवार यांच्यासोबत येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. त्यानुसार, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

त्यानंतर आता, सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या दोन्ही गट एकत्र आणण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. साताऱ्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या विधानावर भाष्य केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांनी काय म्हटलं आहे. याबाबत मला माहिती नाही. प्राप्तीकराच्या नव्या कायद्यासंदर्भात दिल्लीत बैठक हेाती, त्या बैठकीसाठी मी दिल्लीत होते. पण पवारांनी कोणत्या संदर्भाने हे विधान केले आहे, हे बघावे लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना म्हणाल्या, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतचा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही. त्याबाबत मला कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल. त्याबाबतचा निर्णय हा सर्वांशी चर्चा करून घ्यावा लागेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे विविध कार्यक्रमांच्या निमित्त एकत्र येत असतात. ते एकमेकांना भेटत असतात. पण, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. त्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. संघटनेत काम करत असताना एका व्यक्तीला निर्णय घेता येत नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णयही सर्वांशी विचारविनिमय करूनच घ्यावा लागेल, असं सुळे यांनी म्हंटल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!