---Advertisement---

अखेर पाकडे झुकले ; युध्दविरामची घोषणा !

By team
On: May 10, 2025 8:39 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून भारत-पाकीस्तानमध्ये तणाव वाढला असतांना भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकची घबराट झाली असून आज त्यांनी स्वत:हून युध्दविरामाचा प्रस्ताव पाठविला असून आज सायंकाळपासून युध्दविराम लागू झाला आहे. काश्मीरातल्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकला जोरदार प्रत्युत्तर दिले. यातील पहिल्या टप्प्यात दहशतवादी तळ पूर्णपणे नष्ट करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात पाकच्या हवाई तळांना नष्ट करण्यात आले.

पाकिस्तानने अमेरिकन एफ-16 फायटर विमान तसेच चीनी आणि तुर्कीच्या ड्रोनच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असला तरी भारताने हवेतच त्यांना नष्ट केले. काल रात्री भारताने जोरदार मिसाईलने आक्रमण करून पाकचे कंबरडे मोडले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गुर्मीत असलेल्या पाकने शेवटी युध्द विराम करण्याचा प्रस्ताव सादर केला. याआधी दुपारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनी भारत आणि पाकमध्ये संघर्ष विराम होणार असल्याचे जाहीर केले. यानंतर सायंकाळी तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. याआधी भारतीय अधिकाऱ्यांनी संघर्ष विरामाबाबत सूतोवाच केले होते. यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दुपारी साडे तीन वाजता पाककडून युध्द विराम करण्यासाठीची विनंती करण्यात आली. याप्रसंगी भारताने पाकला जोरदार फटकारले. आगामी काळात भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास याला भारतावरील हल्ला मानून प्रत्युत्तर दिले जाईल असे भारताने ठणकावून सांगितले. यानंतर सायंकाळी संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. यात रवी नायक, सोफिया कुरेशी आणि व्योमीका सिंग यांनी सिजफायरबाबतची माहिती दिली.

यात सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकने भारतावर हल्ल्याची आगळीक करतांनाच खोटी माहिती पसरवली. यात भारताला मोठे नुकसान पोहचवण्याची बाब तद्दन खोटी आहे. याच्या उलट भारताने केलेल्या हल्ल्यात पाकचे कंबरडे मोडले आहे. यात पाकच्या हवाई तळांसह लष्करी तळांना आमच्या शूर सैनिकांनी उध्वस्त केले. व्योमिका सिंग म्हणाल्या की, पाकने खूप प्रयत्न करून देखील त्यांना भारताचे काही नुकसान करता आले नाही. तर आम्ही त्यांची मोठी हानी केली. यात आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळांना लक्ष्य केले नव्हते. तर दोन्ही देशांनी युध्दविरामला मंजुरी दिल्याची माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!