---Advertisement---

अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला ; शिंदेंच्या नेत्यांचे मोठे वक्तव्य !

By team
On: May 13, 2025 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

बुलढाणा : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेनेचे नेते, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अभिनेत्री राखी सावंतबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंतचा पाकिस्तानचा जयजयकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शहरातील पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांना अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानचा जय केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत. राखी सावंतसारखी महिला ही महिलांच्या नावावर कलंक आहे. राखी सावंत ही भारतात पैसे कमावते, भारतात खाते, भारतात आराम करते आणि विरोधी देशाच्या जयजयकाराचा नारा देते, तिला तिकडेच गाडले पाहिजे. तिला भारतात येऊ देता कामा नये, असे संजय गायकवाड म्हणाले.

माझं नाव अभिनेत्री राखी सावंत. मी नेहमी खरे बोलते, खोटे बोलत नाही. पाकिस्तानी लोकांना मी तुमच्या सोबत आहे. जय पाकिस्तान, असा व्हिडीओ पहलगाम हल्ल्यानंतर व्हायरल झाला होता. पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर हल्ला झाल्यानंतर त्यांची बाजू घेण्याऐवजी पाकिस्तानची बाजू घेतल्याने तिला देशद्रोही म्हणत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेकांकडून करण्यात आली.

संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलायचे झाले तर संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत. बुलढाणा शहर मतदारसंघाचे ते आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी निसटत्या मतांनी त्यांचा विजय झाला होता. ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!