---Advertisement---

…तर पवार साहेब देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते ; केंद्रीय मंत्री आठवले !

By team
On: May 16, 2025 9:57 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटासोबत शरद पवार यांचा गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार आमच्यासोबत आले असते तर‎देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही पवारांचे ‎‎‎स्वागतच आहे. खासदार पवार‎‎आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ‎‎‎एकत्रच होते, आजही एकत्र आहेत. ‎‎‎अजित पवारांचे म्हणणे एकच होते‎‎की शिवसेना तुम्हाला चालते तर‎‎भाजप का चालत नाही? ते‎प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांद्या लावून‎देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी‎आले असते तर देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. ‎‎अजूनही वेळ गेलेली नाही शरद पवार व अजित पवार ‎‎एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर‎पवारांचे स्वागतच असल्याचा पुनरुच्चारही केंद्रीय ‎‎सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला.‎

जालन्यातील आरपीआय कार्यकर्ते गणेश रत्नपारखे‎यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी ते गुरुवारी ‎‎जालन्यात आले होते. पाकिस्तान दहशतवाद्यांना‎प्रोत्साहन देणारा देश आहे. युद्धाची आवश्यकता‎अजिबात नाही, पाकव्याप्त काश्मीर आम्हाला मिळाला ‎‎पाहिजे, ही आमची भूमिका आहे. युद्ध विरामाची‎विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली असून त्यांनी‎हार मान्य केल्याचेही ते यावेळी म्हणाले.‎

पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात आला ‎पाहिजे, त्यासाठी युद्ध केलं पाहिजे, वेळ आली तर ‎पाकिस्तान ताब्यात घेतले पाहिजे अशी भूमिका मी ‎अनेकवेळा मांडलेली आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती ‎डोनाल्ड ट्रम्प किंवा अन्य कोणाची मध्यस्थी यामध्ये नको ‎आहे. दहशतवादी कारवाया थांबवल्या व पाकव्याप्त ‎काश्मीर आम्हाला सोपवला तर थेट भारत ‎पाकिस्तानबरोबर चर्चा करायला तयार असल्याचे केंद्रीय ‎सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले. ‎

समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट‎यांच्या खात्याचा गोरगरिबांचा निधी‎लाडक्या बहिणीकडे वळवणे योग्य‎नाही. समाजकल्याण व्यतिरिक्त इतर‎अनेक मोठी खाती आहेत, त्या‎खात्याचा निधी लाडक्या बहिणींकडे‎वळवला पाहिजे. कर्नाटकमध्ये‎सामाजिक खात्याचा निधी कुठे‎वळवता येणार नाही, असा कायदा‎आहे. महाराष्ट्र सरकारनेही तसा‎कायदा करावा. तसेच लाडक्या‎बहिणींना आर्थिक परिस्थिती‎सुधारल्यानंतर २१०० रुपये देऊ असे‎आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र‎फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित‎पवार व एकनाथ शिंदे यांनी दिले‎आहे. लवकरच त्यांना २१०० रुपये‎मिळतील अशी अपेक्षा आहे, असे ‎आठवले म्हणाले.‎

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!