---Advertisement---

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोलापुरात निघाली तिरंगा रॅली !

By team
On: May 16, 2025 3:55 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

भारत पाकिस्तान युद्धबंदी लागू झाली असल्याने सीमा भागांमध्ये सध्या वातावरण शांत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचे शौर्य आणि हिम्मत दाखवून दिली आहे. यामुळे ऑपरेशन सिंदूरची पूर्ण जगामध्ये चर्चा आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाच्या सन्मानार्थ भाजपा तर्फे राज्यभरात भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात येत आहे.  यावेळी सोलापूर शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली.

आज दि.१६ रोजी सोलापूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे ,आ. सचिन  कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, माजी खासदार श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य महा स्वामी,भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, चेतनसिंह केदार, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर शहाजी पवार पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!