---Advertisement---

सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षपदाचा शशिकांतनाना चव्हाण यांनी स्वीकारला कार्यभार !

By team
On: May 16, 2025 3:27 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अभियानांतर्गत सोलापूर ग्रामीण (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी श्री. शशिकांतनाना चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. जयकुमारजी गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. शशिकांतनाना चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. समाधान आवताडे हेही उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. शशिकांतनाना चव्हाण यांचे निवडीबद्दल अभिनंदन करत आगामी संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा व्यापक अनुभव व प्रभावी संघटन कौशल्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्याला निश्चितच मिळेल, तसेच पक्षाची धोरणे व विचारसरणी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यातही त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!