---Advertisement---

अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्या उद्घाटन

By team
On: May 17, 2025 6:14 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट येथे अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन रविवार दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती राजे फत्तेसिंह नवरात्र उत्सव मंडळ व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के यांनी दिली.

या प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते तर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी विरक्त मठाचे मठाधिपती बसवलिंग महास्वामीजी, विश्व फाउंडेशन शिवपुरीचे प्रमुख पुरुषोत्तम राजिमवाले,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज पुजारी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुजारी मंदार पुजारी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, भाजपाचे नेते शहाजी पवार,माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी ,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे , पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे , मुख्याधिकारी रमाकांत डाके ,अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे , उपाध्यक्ष अभय खोबरे, आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास अक्कलकोट शहर – तालुक्यातील नागरिकांनीं मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजा फत्तेसिंह नवरात्रोत्सव मंडळ व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सोनटक्के यांनी केले आहे.

फत्तेसिंह चौकात प्रवेशद्वारावर या आहेत प्रतिमा

फत्तेसिंह चौकात उभारण्यात आलेल्या या महाप्रवेशद्वारावर कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ब्रम्हांडनायक श्री स्वामी महाराज, राजमाता जिजाऊ, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न लता मंगेशकर, श्रीमंत विजयसिंहराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले
यांच्या प्रतिमा असुन विद्युत रोषणाई करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!