ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘मिनी विधानसभे’साठी उद्धव ठाकरेंची ठरली रणनिती !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने येत्या ४ महिन्यांच्या आत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश दिले. त्यामुळे आता ‘मिनी विधानसभे’साठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटानेदेखील आपली रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील मोठ्या नेत्यांवर विविध जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

शनिवारी, शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात आली आहे.जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश (Uddhav Thackeray) देण्यात आले आहेत.

राज्यात शिवसेना ठाकरे संघटन मजबूत आहे का? याची माहिती तसेच 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या मतदार संघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यात येणार आहे. शहरांमध्ये शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, प्रभागप्रमुख, 2 वार्डसाठी उपविभागप्रमुख आणि प्रत्येक वॉर्डसाठी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात तालुकाप्रमुख, उपतालुखाप्रमुख, गावपातळीवर शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. या संघटनात्मक रचना पूर्ण करून यादीचा अहवाल आणि आपल्या स्थानिक भागातील कोणते वार्ड अथवा मतदार संघ लढवणे आवश्यक आहे याची माहिती 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी
ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर – सुभाष देसाई, राजन विचारे
पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर- संजय राऊत
धुळे, अहिल्यानगर – अनिल परब, संजय राऊत
कल्याण-डोंबिवली – अनिल परब
उल्हासनगर, पनवेल शहर – अनंत गीते
अमरावती, अकोला – अरविंद सावंत
नागपूर, चंद्रपूर – भास्कर जाधव
वसई-विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर – विनायक राऊत
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे
लातूर, सोलापूर – चंद्रकांत खैरे
परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर – अंबादास दानवे
कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड – सुनील प्रभू

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!