ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग : सोलापुरातील  माजी मंत्र्यांनी कॉंग्रेसची साथ सोडून धरणार शिंदे सेनेची वाट !

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक विरोधी पक्षातील दिग्गज नेते महायुतीमध्ये येत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री काँग्रेसला हात सोडून ते शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेणार आहेत. राज्याचे माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे. अक्कलकोट मतदारसंघाचे म्हेत्रे हे चार टर्म आमदार राहिले आहेत. एक वेळा ते राज्याचे गृहराज्य मंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते. तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.

शेवटी म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी महेश साठे, महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती. त्याच वेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय म्हेत्रे यांनी घेतला. दरम्यान शनिवार 31 मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट मध्ये म्हेत्रे यांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!