बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा नेहमीच वेगवेगळ्या घटनेने चर्चेत येत असतांना आता महाजनवाडी येथे असलेल्या ओटूकंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात शुक्रवारी पहाटे १५ ते २०चोरटे शिरले. सुरक्षा रक्षकाने हटकल्यावर चोरट्यांनीत्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षारक्षकाने आपल्या पिस्तुलातून २ राऊंड फायर केले, यात१ चोरटा ठार झाला. यानंतर चोरट्यांनी तिथून पळकाढला. शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ही थरारकघटना घडली.
मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा पवनचक्कीप्रकल्पांमुळे चर्चेत आहे. मस्साजोग येथेही पवनचक्कीकंपनीला खंडणी मागितल्याचा प्रकार घडला. यालाविरोध केल्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालीहोती, तर मावेजा आणि अडवणूक यामुळे शेतकरी वपवनऊर्जा कंपन्यांमध्येही सातत्याने वाद होत आहेत.त्यामुळे या कंपन्यांना सुरक्षा रक्षक नेमण्याच्या वसीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्याहोत्या. बीड तालुक्यातील महाजनवाडी, लिंबागणेशशिवारात ओटू कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. याप्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी अॅक्टिव्ह पॉवर यासुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीकडे आहे. या प्रकल्पावररुपसिंग टाक (रा. पाटोदा) हे माजी सैनिक सुरक्षा रक्षक आहेत. शुक्रवारी पहाटे १५ जे २० चोरटे कंपनीत शिरले. त्यामुळे सुरक्षा रक्षक टाक यांनी त्यांना अडवले. मात्र चोरट्यांनी त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टाक यांनी पिस्तुलातून फायर केले.
सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात ठार झालेला संशयित हा धाराशिवजिल्ह्यातील रहिवासी आहे.सायंकाळी उशिरापर्यंत त्याचीओळख पटवण्याचे काम सुुरु होते.त्याचे नातेवाईकही घटनास्थळीयेण्यास घाबरत होते. त्यामुळे मृताचेनाव पोलिसांनी जाहीर केले नव्हते. पवनऊजईा कंपन्या चोरट्यांच्यारडावर आहेत. बीड, पाटोदा, केज तालुक्यातील कंपन्यांमधून लाखोरुपयांचे काॅपर वायर व इतर साहित्य चोरी जात आहे. काही दिवसांपूर्वीआवादा कंपनीत चोरी करणारी टोळी बीड पोलिसांनी गजाआड केली होती.
नेकनूर पोलिसांना आधी सुरक्षारक्षकानेच चोरीचा बनाव रचल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसंानीसुरक्षा रक्षक टाकची कसून चौकशीसुरु केली. या चौकशीत त्यानेगोळीबार केल्याची माहिती दिली.त्यानंतर पोलिसंानी पुन्हा पाहणीकेली, त्यावेळी मृतदेह आढळला. या प्रकरणात चोरीचा प्रयत्नकेल्याचा व खुनाचा असे दोनवेगवेगळे गुन्हे नोंदवले जाणारआहेत. सुरक्षा रक्षक टाक यांच्याकडेपिस्तुलाचा परवाना असल्याचे तेसांगत आहेत. मात्र आम्ही त्याचीखात्री करत आहोत. आताच मृताचेनाव सांगता येणार नाही.