---Advertisement---

दोन खासगी बसची जबर धडक : दोघांचा जागीच मृत्यू !

By team
On: May 29, 2025 11:14 AM
Follow Us:
---Advertisement---

लातूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता लातूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू, तर काही प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात तुळजापूर -लातूर महामार्गावरील आशीव पाटी येथे झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यावरून लातूरकडे जात असलेल्या एका खासगी बसने दुसऱ्या खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात लातूर-तुळजापूर महामार्गावरील आशीव पाटी ते उजनी दरम्यान झाला आहे.

खासगी बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. १५ ते २० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, चारच दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा याच लातूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला नेले जात होते. पण या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. आर. टी. देशमुख यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!