---Advertisement---

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी : गहाळ झालेले १३ मोबाईल तक्रारदारांना परत

By team
On: May 29, 2025 3:15 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : मारुती बावडे

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गहाळ झालेल्या एकूण १३ मोबाईल हँडसेट्स, एकूण अंदाजे किंमत ₹१,२५,०००, हे CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले असून, संबंधित तक्रारदारांना पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दरवर्षी अक्कलकोटमध्ये राज्यातून व परराज्यातून हजारो भाविक येतात. या गर्दीचा फायदा घेऊन अनेकदा भाविकांचे मोबाईल चोरी अथवा गहाळ होतात. अशाच गहाळ मोबाईलची तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने अक्कलकोट उत्तर पोलिसांनी हा महत्वाचा तपास पूर्ण केला.

ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विलास यामावार (अक्कलकोट विभाग) व पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

ही संपूर्ण मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस अंमलदार १५२८ माने, १४४६ पवार, तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीण येथील पो. अं. ११८२ रतन जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तक्रारदारांना मोबाईल विनाविलंब आणि कोणताही अतिरिक्त खर्च न करता परत मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अशी प्रभावी कार्यवाही पोलिसांच्या जनतेतील विश्वासाला बळकटी देणारी असून, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!