---Advertisement---

देवा अजब तुझे सरकार…! राजू शेट्टी यांनी साधला सरकारवर निशाणा !

By team
On: May 31, 2025 10:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकार सत्तेवर असतांना आता पुण्यातील येरवडा कारागृहात कपडे इस्त्री आणि धुलाई केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरच्या केंद्रांमध्ये साहित्य खरेदी करताना घोटाळा झाला असल्याचा आरोप आता होत आहे. या प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. देवा अजब तुझे सरकार…! असे म्हणत राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

या संदर्भात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. कारागृहात साहित्य कमी दिसत आहे. मग इतर साहित्य निदर्शनास का येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत साहित्य खरेदी केल्याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे देखील राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय हा कारागृह घोटाळा देवा अजब तुझे सरकार..!

पुणे येथील येरवडा कारागृहात कपडे इस्त्री व धुलाई केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरच्या केंद्रामध्ये वॅाशिंग -मशिन , ड्रायर व इस्त्री करण्याचे डोसिंग पंप खरेदी करण्यात आले आहे. सदरच्या साहित्याचा फोटो सोबत जोडला आहे. सदरचे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने १ कोटी १५ लाख रूपये मंजूर केले आहेत. या साहित्याच्या किमतीची चौकशी केली असता सदरचे सर्व त्याच कंपनीचे साहित्य २६ लाख ४ हजार २६० रुपयाला मिळत असल्याचे पुरावे सापडले आहेत.

सदर साहित्य व्यतिरिक्त धुलाई बाबतचे इतर कोणतेच साहित्य कारागृहात निदर्शनास येत नाही. मात्र कारागृह विभागाने याकरिता १ कोटी १५ लाख रूपये खर्च दाखविला आहे. मग उर्वरित ८५ लाख ४६ हजार रूपयांचे कोणते साहित्य खरेदी केले याबाबतची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!