---Advertisement---

मोठी बातमी : बडतर्फ पोलीस अधिकारी कासलेला पुन्हा अटक !

By team
On: June 1, 2025 2:57 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या अनेक दिवसांपूर्वीच बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या गुन्हाच्या अनुषंगाने कासलेला अटक करण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

दोन समाजात तेढ निर्मा करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुबंईत देखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी बीड, परळी, आंबेजोगाई येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. समाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांनी तक्रार दिली आहे. तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. याशिवाय मंत्री संजय शिरसाठ यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मीडियावर केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी तक्रार दिली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!