---Advertisement---

वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवे वळण : हगवणे माया–लेकांवर अटकेची कारवाई !

By team
On: June 2, 2025 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चेत येत असतांना आता या प्रकरणाला आता एक मोठे वळण आले आहे. वैष्णवीचा नवरा शशांक आणि सासू लता यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. येरवडा तुरुंगात असलेल्या या हगवणे माया – लेकांवर म्हाळुंगे पोलीस स्टेशनकडून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.

या दोघांवर जेसीबी मशीनच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात येळवंडे यांनी म्हाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हगवणे माय-लेकाने जेसीबी मशीन विक्रीच्या व्यवहारात खोटे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीवर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने शंशाक आणि लता हगवणे यांना अटक करण्याची परवानगी दिली.

खेड तालुक्यातील नियोजे गावचे रहिवासी प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात तब्बल 11 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. मार्च 2022 मध्ये प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून एकूण 24 लाख रुपये किंमतीचा जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. सुरुवातीला पाच लाख रुपये रोख देऊन त्यांनी जेसीबी ताब्यात घेतला. परंतु त्यानंतर लक्षात आले की या जेसीबीवर आधीच इंडसइंड बँकेचे 19 लाखांचे कर्ज आहे.

हा मुद्दा समोर आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दरमहा 50 हजार रुपये हप्ते देण्याचा तडजोडीचा करार झाला. त्यानुसार येळवंडे यांनी एकूण 6 लाख 70 हजार रुपये लता हगवणे यांच्या खात्यावर जमा केले. मात्र, या रकमेचा वापर कर्जफेडीसाठी न करता हगवणे कुटुंबाने स्वतःसाठी केल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांच्याकडून करण्यात आला. लवकरच हगवणे माया – लेकांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले जाणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!