---Advertisement---

आमदार कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून कुंभारी सभा मंडपाचे लोकार्पण

By team
On: June 13, 2025 2:36 PM
Follow Us:
---Advertisement---

कुंभारी :- प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी त्यांच्या सहा लाख निधीतून मड्डी वस्ती येथील धानम्मा देवी भव्य सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना कुंभारी तो उभारण्यात आलेल्या या सभामंडपाने आपल्याला आत्मीय समाधान मिळाल्याची भावना आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली.

माजी खासदार तथा डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री. ष. ब्र. रूपात शिवाचार्य महास्वामीजी ( गुड्डापूर), जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अण्णाराव बाराचारे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद आंदोडगी, धीरज छापेकर, सागर थोंटे, संजय मुचंडे, संजयकुमार वाले , मल्लय्या स्वामी, संजय स्वामी, ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष खजिनदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

धानम्मा देवी की जय या गजरात झालेल्या जयघोषाने या सभा मंडपाचे लोकार्पण हा मनस्वी आनंदाचा सोहळा आहे. धानम्मा देवीच्या आशीर्वादाने कुंभारीत आनंददायी वातावरणात हा सुखद सोहळा अनुभवता आले. हे आपल्यासाठी आत्मीय समाधान असल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!