ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबीरांचे अक्कलकोट तालुक्यात आयोजन

लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ मिळणार

अक्कलकोट  : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यात सोमवार, दि.१६ जून रोजी जिल्हा प्रशासन व प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास सोलापूर यांच्यावतीने महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांचा मुख्य उद्देश म्हणजे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देणे होय,असे तहसीलदार विनायक मगर यांनी सांगितले.

या शिबीरामध्ये वैयक्तिक लाभ योजनांचा समावेश असून नागरिकांना त्यांच्या परिसरातील ठिकाणीच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या मूळ कागदपत्रांसह शिबिरात हजेरी लावून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.जुने तहसील कार्यालय, अक्कलकोट, शेळके प्रशाला, वागदरी, ग्रामपंचायत कार्यालय, जेऊर,ग्रामपंचायत कार्यालय, नागणसूर,नगरपरिषद कार्यालय, मैंदर्गी, नगरपरिषद कार्यालय, दुधनी,ग्रामीण विद्यालय, चपळगाव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तडवळ, जिल्हा परिषद शाळा, करजगी,तलाठी कार्यालय, किणी येथे १६ जून रोजी शिबिरे भरविण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे शासनाच्या योजना गावपातळीवर पोहोचणार असून विशेषतः आदिवासी समाजातील गरजूंना मोठा लाभ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!