---Advertisement---

शेतकरी परीवारावर दुखांचा डोंगर : मुलानंतर आई-वडिलांचा मृत्यू !

By team
On: June 14, 2025 11:07 AM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड : वृत्तसंस्था

लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावाने त्रस्त तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. या घटनेचा धक्का वडिलांना इतका जबरदस्त बसला की त्यांचा दोन दिवसांत मृत्यू झाला आणि या दुःखाने आईला हृदयविकाराचा झटका आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल भीमराव बेदरे (वय 27) हा तरुण शेती आणि मजुरी करून घरखर्च भागवत होता. पण सततच्या नापिकीने आणि वडिलांच्या आजारपणाने तो नैराश्यात गेला आणि 10 जून रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्याने जीवन संपवलं. त्याच्या मृत्यूचा धक्का वडील भीमराव बेदरे यांना सहन न झाल्याने दोन दिवसांनी, 12 जून रोजी त्यांचं निधन झालं. पती आणि मुलाच्या मृत्यूमुळे आई शोभाबाई बेदरे यांनाही हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सावरगावसह संपूर्ण परिसरात शेती कोरडवाहू असून सिंचनाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. ग्रामस्थांनी धोंड प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याची सोय व्हावी आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन केवळ घोषणा न करता ठोस उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा अशा दुर्दैवी घटनांचा आकडा वाढतच राहील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!