---Advertisement---

भाजपला आणखी काही लोकांची गरज ; जयंत पाटलांचा टोला !

By team
On: June 15, 2025 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरु झाली होती. यावर आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मौन सोडले आहे.

भारतील जनता पक्षाला मुंबईत आणखी मदतीची गरज आहे, असे दिसून येत आहे. म्हणून ते इतर पक्षांसोबत संपर्क साधत असून हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत, रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असे म्हणता येणार नाही. आम्ही संपूर्ण इाकरे कुटुंबियांना जवळून पाहिजे आहे, आम्हाला असे काही वाटत नाही. आगामी निवडणूक आम्ही आमच्या विचाराच्या मविआतील पक्षासोबत लढवू असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या .या ठेवी आता रिकाम्या होऊ लागल्या आहेत .2 लाख 36 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत मात्र यांच्याकडे द्यायला पैसा नाही .असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ यांच्यावर आली आहे असे म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आपल्या समोर मोठी आव्हान आहेत. पक्षाची दोन शकले झाली मात्र मुंबईचे कार्यकर्ते कुठे गेले नाहीत 2-4 टक्के माणसं फक्त इकडे तिकडे गेली. लोकसभा झाल्यानंतर लोकं आमच्याकडे इकडे यायला लागली. फुटपाथवर सुद्धा प्रवेश करू लागली. गाड्या थांबवून प्रवेश घेऊ लागले. म्हणाले साहेबांना भेटून आलोय आम्हाला प्रवेश द्या. आम्ही सुद्धा त्यांना बुके दिला. काही दिवसांत विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर ते दिसायचे बंद झाले. तुम्ही समोरच्याना घाबरू नका ते फक्त बॅनरवर असतात. कुणाचा फोटो असणार हे देखील फिक्स आहे. समोरच्या भपकेगिरीला घाबरू नका. अद्याप आघाडीची एकत्रित लढायचं की वेगळं लढायचं याबाबत चर्चा झाली नाही. लवकरच त्याबाबत निर्णय होईल.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!