ध्यास विश्वसार्ह बातमीचा

झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटला : नागपूरची तरुणी 30 फूट खाली पडली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक परिवार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला जात असतात आताच नागपूरच्या एका कुटुंबावर मनालीमध्ये भीषण अपघात ओढवला आहे. झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटल्याने एक तरुणी 30 फूट उंचीवरून खाली पडली, यात तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत.

त्रिशा बिजवे असे तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील साहसी खेळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्रिशाच्या कुटुंबीयांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
पर्यटन आणि तेथील सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे अनेकदा पर्यटनस्थळी साहसी खेळ खेळतानाही प्रवाशांच्या जीवावर बेतले जाते. अनेकदा पुरेशी सुरक्षा नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीवघेणा टास्क केला जातो. पर्यटनस्थळी साहसी खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास काय बेतू शकते, हे त्रिशासोबत घडलेल्या घटनेवरून दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार 8 जून 2025 रोजी त्रिशा झिप-लाइन खेळत असताना, तिला जोडलेला बेल्ट अचानक तुटला आणि ती 30 फूट खाली कोसळली. सुदैवाने, झिप-लाइनची उंची जास्त नसल्याने आणि त्रिशा उतरण्याच्या ठिकाणाजवळ असल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेनंतर त्रिशावर सुरुवातीला मनाली आणि नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ देखील कुटुंबीयांनी शेअर केला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!