---Advertisement---

डॉ. शिवराय आडवीतोट यांचे कार्य दीप स्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे : डॉ. शिवाचार्य महास्वामीजी !

By team
On: June 16, 2025 5:44 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी 

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी बी खेडगीज बसवेश्वर विज्ञान राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्टस् महाविद्यालय, अक्कलकोट शिवराय आडवी तोट हे खेडगी महाविद्यालयात गेल्या 37 वर्षाच्या सेवेनंतर प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त होत असताना त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील गरीब होतकरू व सर्व समाजातील विद्यार्थ्यांकरता केलेले कार्य हे दीपस्तंभ प्रमाणे आहे असे मत शिवाचार्य रत्न डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराया आडवी तोट यांच्या सेवानिवृत्ती आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे हे होते.

याप्रसंगी व्यासपीठावर अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलीगप्पा खेडगी, व्हॉइस चेअरमन अशोक हारकुड सचिव सुभाष धरणे, संचालिका शोभाताई खेडगी, श्रीशैल भरून शेट्टी चंद्रकांत स्वामी, अडवोकेट अनिल मंगरुळे माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, प्राचार्य के. एम जमादार, संस्थापक अध्यक्ष सोलापूर भूगोल शिक्षक संघ, डॉ. प्रवीण सप्तर्षी, पुणे महास्वामीजी पुढे असे म्हणाले की सेवानिवृत्ती हे शासकीय नियमाप्रमाणे झालेली असते यापुढे तुमचे कार्य शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आवश्यक असून शैक्षणिक क्षेत्रात आणखीन जोराने काम करण्याची संधी आणि सेवानिवृत्तीनंतर जो वेळ मिळते त्याचा वापर आपण करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी महेश हिडोळे बसली गप्पा खेडगी, श्रीमती शोभाताई खेडगी प्राचार्य शेख, प्रवीण , सरांची कन्या पल्लवी फुलारी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार प्रसंगी सेवा व समर्पणाचा दीपस्तंभ या गौरव अंकाचे प्रकाशन श्रीमती शोभाताई खेडगी व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक मान्यवरांकडून लेख लिहिले गेले आहेत. सत्कारास उत्तर देताना प्राचार्याने संस्थेने, आई-वडिलांनी, समाजाने केलेले ऋण फेडण्याची संधी शिक्षण क्षेत्राची सेवा करताना झाली. अक्कलकोट तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांचे कल्याण कसे होईल हे जपले आहे.

अध्यक्ष समारोप करताना मेहेत्रे यांनी प्राचार्य आडवी तोट यांनी आजपर्यंत सरस्वतीची सेवा प्रामाणिकपणाने केल्यामुळे आज भूगोल शिक्षक संघ आणि त्यांच्या विद्यार्थ्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगादरम्यान ज्ञानियांची मांदियाळी हे त्यांनी केलेल्या कार्यकर्तुत्वाचा पोचपावती आहे. समाज सेवा करताना ते प्रामाणिकपणे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या पुढील आयुष्यास शुभेच्छा देतो. याप्रसंगी सरांच्या जीवनप्रकाशावर डॉ. लता प्रशांत हिंडोळे यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मोहरकर तर तर कोणदे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!