---Advertisement---

आ.पडळकर यांचे वादग्रस्त विधान : कोणी आले तर ठोकून काढा !

By team
On: June 18, 2025 5:49 PM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

राज्यातील सांगलीतील ऋतुजा राजगे या 7 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने धर्मांतराला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मुक निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केले. धर्मांतरासाठी कोणी आले तर ठोकून काढा. धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी सैराट करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर करा, असे पडळकर म्हणालेत.

सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी गावात ख्रिश्चन धर्मांतरासाठी सासरच्यांकडून सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा राजगे हिला छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मानसिक छळाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सांगली शहरात विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्रमक भाषेत धर्मांतरणावर जोरदार हल्लाबोल उपरोक्त विधान केले.

धर्मवीर संभाजी महाराजांनी माझा जीव गेला तरी धर्म बदलणार नाही असे औरंग्याला सांगितले. हाल हाल होऊन मेले तरी तरी धर्म बदलला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांची विचारांची कन्या ऋतुजा आहे, असे पडाळकर म्हणाले. तिनेही धर्मासाठी बलिदान दिले. परंतु आपल्या लेकींनी अशी टोकाची पावले उचलायला नको, यासाठी आता आपण धर्मांतर घडवून आणण्यासाठी येणाऱ्यांना ठोकून काढण्याची मोहीम सुरू करू, असे गोपीचंद पडळकर म्हणालेत.

हिंदू धर्म कोणावर अन्याय करणार नाही. ऋतुजा ही उच्च शिक्षित मुलगी होती. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. कोळी नामक नायब तहसीलदाराने ऋतुजाचे लग्न लावले तो आजही शासकीय सेवेत आहेत. पण सात महिन्यांची गर्भवती असताना छळापायी तिला जीवन संपवावे लागले. यापुढे धर्मांतर करण्यासाठी जो व्यक्ती गावात घरात येईल आणि बळजबरी करेल त्याला बदडून काढा. लव्ह जिहाद करणारे जसे हिरवे साप आहेत तसे ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर आहेत. अशा अजगरांवर जेसीबी फिरवण्याचे काम केले पाहिजे, असे पडळकर म्हणाले.

आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षिसे ठेवली जातात. त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीसे ठेवली पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचे बक्षीस. दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचे, तर तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचे बक्षीस. जो कुणी पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस ठेवले पाहिजे, असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!