---Advertisement---

धोत्री–मुस्ती रोडवर भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : तीन कामगार ठार !

By team
On: June 24, 2025 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यतील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मृतांमध्ये देविदास दुपारगडे (वय 40), नितीन वाघमारे (वय 35), आणि हनुमंत राठोड (वय 40) या तिघांचा समावेश आहे. तिघेही मुस्ती गावचे रहिवासी होते. अपघातानंतर तिघांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!