---Advertisement---

सोलापुरात माजी महापौरांचे धक्कादायक कृत्य : रूममध्ये घुसून केला महिलेचा विनयभंग !

By team
On: June 27, 2025 5:09 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या नेत्याने थेट लॉजच्या रूममध्ये घुसून महिलेचा विनयभंग केला, असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मनोहर सपाटे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला असून ते सोलापूरचे माजी महापौर देखील आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदरील तक्रारदार महिला ही पुणे येथे वास्तव्यास असून ती मूळ उत्तर सोलापूर येथील रहिवासी आहे. त्यांची गावाकडे शेती आहे. गावातील शेतीच्या वादामुळे त्यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागते. या वादासंदर्भात सोलापूरमध्ये वकिलांना भेटण्यासाठी त्यांना वारंवार यावे लागते. अशाच कामासाठी संबंधित महिला 14 जून रोजी मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉज मध्ये थांबल्या होत्या. त्याच दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप सदरील महिलेने केला आहे.

या तक्रारीतमध्ये पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे त्या रूम नंबर 202 मध्ये थांबल्या होत्या. तर पुढे दोन दिवस त्या रूम नंबर 205 मध्ये राहिल्या. मात्र 16 जूनच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास मनोहर सपाटे यांनी रूमचा दरवाजा ठोठावला. तसेच आतमध्ये प्रवेश केला तसेच महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या महिलेसोबत मनोहर सपाटे याने अश्लील हावभाव करीत विनयभंग केला असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. सदरील महिलेने तक्रार करण्याचा इशारा देताच, तू कुठेही तक्रार केली तरी मला काही फरक पडत नाही. माझे वय आता जास्त झाले आहे. त्यामुळे मला लगेच जामीन मिळतो, असे देखील सपाटे याने सांगितले असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात असे का करता? असा प्रश्न त्या महिलेने विचारला होता. यावर सपाटे याने पीडित महिलेला शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेचा वापर केला होता. सदरीत पीडित महिला ही 24 जून रोजी वकिलांचा सल्ला घेण्यासाठी पुन्हा सोलापूर येथे आल्या होत्या. त्यावेळी देखील आरोपी सपाटे याने फोन करून लॉजवरील रूम नंबर 307 वर येण्याचा आग्रह सुरू केला होता. आता या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस तपासात सर्व बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!