---Advertisement---

अजितदादांनी मुख्यमंंत्री व्हावं, नेत्यांने केली पांडुरंगाकडे प्रार्थना !

By team
On: June 28, 2025 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांकडून ते मुख्यमंत्री होण्याबाबची विधाने केली जात आहे. काही नेत्यांनी तर देवाला साकडे देखील घातल्याचे त्या नेत्यांनीच सांगितले आहे. याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी पांडुरंगाला साकडे देखील घातले असल्याचे त्यांनी सांगितले होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील आम्हालाही वाटतं अजितदादांनी मुख्यमंंत्री व्हावं, अशी इच्छा बोलून दाखविली होती. अशातच आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबतचे वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तशाच प्रकारचे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन झाल्यास अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बोलून दाखविली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन झाल्यास अजितदादाच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केली असल्याचे देखील प्रताप पाटील चिखलीकर यावेळी बोलताना म्हणाले.

मी पांडुरंगाच्या दर्शन घेण्यासाठी १९ वर्षांपासून वारीत जात असतो. पांडुरंगाच्या चरणी लीन झालो. पांडुरंगाकडे प्रार्थना केली की राज्यातील शेतकरी, कष्टकरी सुखी समृद्ध व्हावा. नांदेड आणि काही भागावर दुबार पेरणीचं संकट येणार होतं ते टळावं आणि ते टळलं. याबाबत पाडुंरगाकडे प्रार्थना केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की अजित पवार पुढच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून पुजेला यावेत यावर तुमचं मत काय? या प्रश्नाचे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठं पद मिळालं तर निश्चित दादाच मुख्यमंत्री होतील. दादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली असल्याचे पाटील चिखलीकरांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!