---Advertisement---

धक्कादायक :आश्रमात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची निर्घृण हत्या !

By team
On: June 28, 2025 5:16 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूरमधील आश्रमात महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात आले असता त्यांनी संगीताताईंना आवाज दिला. प्रतिसाद न आल्याने त्यांनी मंदिराशेजारील शेडकडे जाऊन पाहिले असता, संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या..

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका आश्रमात संगीताताई महाराज वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून त्यांच्यावर दगडाने वार केले. या हल्ल्यात संगीताताई महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी तातडीने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.  वैजापूरच्या चिचडगावमध्ये मोहटादेवीचे मंदिर असून त्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये संगीताताई पवार या थांबतात. त्या रात्री एकट्या असताना कुणीतरी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोड येथे असणाऱ्या मोहटादेवी आश्रमामध्ये राहणाऱ्या ह. भ. प. संगीताताई महाराज यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. मात्र एका महिला कीर्तनकाराची थेट आश्रमात घुसून दगडाने ठेचून निर्घृण हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या हत्येमागे व्यक्तिगत वाद आहे की अन्य कोणते कारण, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलिसांचे तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे.

संगीताताईंची जिथे हत्या झाली तेथील मंदिराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले आहे. त्या मंदिरातील काही वस्तू चोरीला गेल्या का? याबाबत तपास केला जात आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास केला जात आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना स्थानिक आमदार रमेश बोरनारे म्हणाले, ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. माहिती मिळताच मी त्वरित घटनास्थळी आलो. पोलिस प्रशासन सज्ज आहे, मात्र आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मी मागणी करतो.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!